आमचे गोपनीयता सिद्धांत

Snap मध्ये आम्ही तुमच्या गोपनीयतेला प्राधान्य देतो. आम्ही जाणतो की Snapchat किंवा आमचे इतर कुठलेही उत्पादन तुम्ही वापरतांना तुमचा विश्वास आम्ही कमवतो - त्यामुळेच इतर बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांच्या तुलनेत आम्ही तुमच्या माहितीची हाताळणी वेगळ्या प्रकारे करतो.

आम्ही तुमचे खासगी संदेश जमा करीत नाही आणि तुमचे जे काही पोस्ट केले आहे त्याचे कालक्रमानुसार सार्वजनिकरित्या प्रदर्शन करीत नाही. Snapchat ची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की जी गोष्ट तुम्हाला जेव्हापर्यंत सामायिक करायची आहे तीच गोष्ट लोकांना तेवढ्या कालावधीपर्यंत बघता येईल. आमचा विश्वास आहे की यामुळे Snapchat एखाद्या स्थायी रेकॉर्डप्रमाणे भासणार नाही तर मित्रांसोबत उत्साहवर्धक चर्चेप्रमाणे भासेल.

जरी आमची उत्पादने सतत विकसित होत असली तरीसुद्धा आमचे गोपनीयता सिद्धांत बदलत नाही:

आम्ही प्रामाणिकपणे आणि खुल्यापणाने संवाद साधतो.

तुम्ही Snap उत्पादने वापरतांना आमच्यासोबत माहिती सामायिक करता - त्या माहितीचा वापर कसा केला जातो हे समजण्यास तुमची मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही माहितीचे संकलन, वापर आणि तिला सामायिक कसे करतो हे गोपनीयता धोरणामध्ये मध्ये स्पष्ट केले आहे - आपण येथे ठळक बिंदू वाचू शकता. विशिष्ट सेवा तुमच्या माहितीचा वापर कसा करतात याची जर आपल्याला जिज्ञासा असेल तर उत्पादनानुसार गोपनीयता यामध्ये आणखी वर्गीकरण दिलेले आहे. थेट आमच्या ॲपमध्ये विविध सेवा डाटाचा वापर कसा करतात आणि मदत केंद्रामध्ये वापर कसा केला जातो हे सुद्धा स्पष्ट केले आहे. अर्थातच, जर तुम्हाला हवे ते अद्याप मिळाले नसेल तर तुम्ही कधीही विचारू शकता!

स्वत:ला व्यक्त कसे करायचे याची निवड तुम्ही करता

स्व-अभिव्यक्ती सक्षम बनण्यास गोपनीयता महत्वाची आहे असा आमचा विश्वास आहे. यामुळेच तुम्ही गोष्टी कुणासोबत सामायिक करता, त्यांना कशाप्रकारे सामायिक करता आणि ते किती काळ त्या पाहू शकतात याचे नियंत्रण तुमच्याजवळच आहे. तुमची गोष्ट कोण बघू शकेल, Snap मॅपवर कोणते मित्र तुमचा Bitmoji बघू शकतील आणि तुमचा Snap किती काळ तेथे असेल हे तुम्हीच ठरवता. तुम्ही गोष्टी फक्त तुमच्या आणि मित्राच्या दरम्यानच ठेऊ शकता किंवा संपूर्ण जगासोबत आपला क्षण सामायिक करू शकता! अधिक माहिती घ्या.

आम्ही गोपनीयतेला ध्यानात ठेवून डिझाइन करतो

नवीन वैशिष्ट्ये तीव्र गोपनीयता आढावा प्रक्रियेमधून जातात - आम्ही नवीन कल्पनांविषयी बोलतो, त्यावर वाद-विवाद करतो आणि आम्हाला अभिमान वाटेल व वापरण्यास आवडेल अशा उत्पादनांची निर्मिती करण्यास कठीण परिश्रम करतो. सरतेशेवटी, आम्ही ही उत्पादने दररोज वापरतो, कामावरही आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यातही. आम्ही तुमची माहिती तेवढ्याच काळजीपूर्वक हाताळतो जेवढ्या काळजीने आम्ही आपली, आमच्या कंपनीची, कुटुंबाची आणि आमच्या मित्रांची माहिती हाताळतो.

तुमच्या माहितीचे नियंत्रण तुम्हीच करता

तुमच्या माहितीचे नियंत्रण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुमची माहिती अॅक्सेस करण्याचे आणि अपडेट करण्याचे सोपे मार्ग आम्ही प्रदान करतो, तुम्ही आमच्यासोबत किती माहिती सामायिक करता त्याचे आणि आम्ही तुमची माहिती किंवा तुमचे खाते दोन्हीही नष्ट करण्याच्या तुमच्या विनंतीचे समायोजन करतो. तुम्ही थेट आमच्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये तुमच्या बहुतांश गोपनीयता सेटिंग्जचे नियंत्रण करू शकता. इतकेच नव्हे तर तुम्हीयेथे तुमची Snapchat माहिती लॉगइन आणि डाउनलोडही करू शकता. जर तुम्हाला कधीही तुमच्या डाटाविषयी नेमके काही प्रश्ने विचारायची असतील तर आमच्याशी संपर्क करण्यास संकोच करू नका!

हटवणे हे आमचे मूलभूत कार्य आहे

मित्रांसोबत वैयक्तिकरित्या धमाल करण्याची भावना मिळवण्याचे ध्येय Snapchat ने ठेवले आहे - त्यामुळेच Snap आणि चॅट्सना उघडल्यानंतर किंवा कालबाह्य झाल्यानंतर ते आमच्या सर्व्हरवरून हटवले जातात. Snap हटवल्यानंतर आम्ही प्रामुख्याने मूलभूत तपशील बघण्यास समर्थ होऊ - जसे की तो केव्हा आणि कुणाला पाठवला होता. अधिक माहिती घ्या.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की इतर स्नॅपचॅटर्स नेहमीच स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा त्रयस्थ-पक्षाचे ॲप वापरून गोष्टी जतन करू शकतात. सरतेशेवटी, ज्या लोकांवर तुम्ही खरोखर विश्वास ठेवता त्यांच्यासोबत आवश्यक तेवढेच सामाईक करणेच उत्तम असते - जसे तुम्ही वास्तविक जीवनात करता!

हॅपी स्नॅपिंग!