कुकी धोरण
ब्राउजर कुकी म्हणजे तुमच्या डिव्हाइसवर साठवण्यात आलेला डेटाचा असा एक छोटासा तुकडा असतो की जो वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सना तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करतो. अशाच हेतूंसाठी तुमच्या डिव्हाइसशी संबंधित असणार्या वेब स्टोरेज किंवा इतर अभिज्ञापके यांसहित इतर तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. प्रस्तुत धोरणामध्ये, असे सर्व तंत्रज्ञान आम्ही 'कुकी' या शब्दाने संदर्भित केले आहे.
आमचे गोपनीयता धोरण हे स्पष्ट करते की जेव्हा तुम्ही Snapchat किंवा Snap Inc. संबंधित इतर सेवा वापरता तेव्हा आम्ही तुमच्याकडून किंवा तुमच्याबद्दलची माहिती कशा प्रकारे जमा करतो. तुमच्या कुकी व इतर संबंधित निवडींचा आम्ही कशा प्रकारे वापर करतो हे या धोरणात तपशीलवारपणे स्पष्ट केले आहे.
आम्ही कुकींचा कशा प्रकारे वापर करतो
ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या बहुतांशी इतर पुरवठादारांप्रमाणेच, Snap Inc. सुद्धा कुकींचा तसेच तृतीय-पक्ष कुकींचा वापर, तुमचा Snapchat डेटा आणि खाते यांचे संरक्षण करणे, कुठले फीचर्स अधिक लोकप्रिय आहेत हे आम्हास समजण्यास मदत होणे, एखाद्या पेजवर किती अभ्यागत भेट देतात हे मोजणे, आमच्या वापरकर्त्यांच्या अनुभूतीमध्ये सुधारणा करणे, आमच्या सेवा संरक्षित ठेवणे, सुसंगत जाहिराती दाखविणे, आणि विशेषतः तुम्हाला एका अधिक चांगल्या, अधिक अंतःस्फूर्त आणि समाधानदायी अनुभूतीचा लाभ देणे यांसारख्या अनेक कारणांसाठी करते. आम्ही वापरतो त्या कुकी साधारणपणे खालील प्रकारात मोडतात.
| कुकींचे प्रकार | आम्ही कुकी का वापरतो |
|---|---|
| आवश्यक |
आम्ही या कुकी आमची साईट चालवण्यासाठी तसेच सुरक्षेशी संबंधित धोके ओळखण्यासाठी आणि ते टाळण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही या कुकींचा वापर तुमच्या सत्राची माहिती साठवण्यासाठी अशा प्रकारे करू शकू की ज्यामुळे इतर कुणाला तुमच्या वापरकर्तानाव किंवा पासवर्डशिवाय तुमचा पासवर्ड बदलता येऊ नये. |
| पसंतीक्रम |
आम्ही या कुकी तुमचे सेटिंग्ज आणि पसंतीक्रम लक्षात ठेवण्यासाठी वापरतो, तसेच आमच्या साईटवरच्या तुमच्या अनुभूतीत सुधारणा करण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही या कुकी तुमच्या भाषांचे पसंतीक्रम लक्षात ठेवण्यासाठी वापरू शकू. |
| कामगिरी |
तुम्ही आमची साईट कशाप्रकारे वापरता याबद्दलची माहिती मिळविण्यासाठी तसेच साईटच्या एकूण कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी आम्ही या कुकी वापरतो; ज्याद्वारे आम्हाला आमच्या साईटच्या कामगिरीत तसेच आमच्या सेवांमध्ये आणि तुमच्या अनुभूतीत सुधारणा करता येते. उदाहरणार्थ, आमच्या वापरकर्त्यांमध्ये कुठले फीचर्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत आणि कुठल्या फीचर्समध्ये सुधारणांची गरज आहे हे समजण्यासाठी आम्ही या कुकींचा वापर करू शकतो. |
| मार्केटिंग |
आम्ही या कुकींचा वापर जाहिराती पोचवण्यासाठी करतो, त्यांना उपभोक्त्यांच्या दृष्टीने अधिक सुसंगत तसेच अर्थपूर्ण करण्यासाठी करतो, तसेच आमच्या सेवांमधील तसेच इतर साईट्स आणि मोबाईल अॅप्सवरील आमच्या जाहिरात मोहिमांच्या परिणामकारकतेचा मागोवा घेण्यासाठी करतो. आमचे tत्रयस्थ-पक्ष जाहिरात भागीदार या कुकींचा वापर तुमच्या रुचींचा प्रोफाइल बनविण्यासाठी व इतर साईट्सवरील संबंधित जाहिराती देण्यासाठी करू शकतात.
|
विश्लेषणे आणि जाहिरात सेवा
इतरांद्वारे प्रदान केलेल्या
आम्ही इतर कंपन्यांना आमच्या सेवांवर कुकीज वापरु देऊ शकतो. या कंपन्या वेळोवेळी आमच्या सेवांचा वापर तुम्ही कसा करता याबद्दलची माहिती संकलित करू शकतात आणि इतर सेवा आणि कंपन्यांमधील त्यासारख्याच माहितीसह एकत्रित करू शकतात. ही माहिती, इतर गोष्टींबरोबरच, डेटा विश्लेषित करण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी, विशिष्ट मजकूराची लोकप्रियता निर्धारित करण्यासाठी आणि तुमच्या ऑनलाइन क्रियेला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वापरली जाऊ शकते.
याव्यतिरिक्त, आमचे संलग्नअसलेल्यासह, काही कंपन्या, गैरव्यवहार किंवा इतर अनधिकृत किंवा बेकायदेशीर कृत्ये टाळण्यासाठी आणि जाहिरातींचे कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट करण्यासाठी तृतीय पक्षाच्या वेबसाइट्स आणि अॅप्सची समावेशासह आमच्या किंवा इतर कंपन्यांच्या वतीने अधिक संबंधित जाहिराती डिलिव्हर करण्यासाठी आमच्या सेवांवर संकलित केलेली माहिती वापरू शकतात. स्वारस्य-आधारित जाहिराती आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या निवडींबद्दल अधिक माहितीसाठी येथेजा.
आम्ही प्रदान केलेल्या
आमच्याद्वारे प्रदान केलेल्या कुकीज वापरत असलेल्या तृतीय पक्षाच्या सेवांची आणि तुमच्या क्रियेविषयीची माहिती आम्ही संकलित करू शकतो. जाहिरातींची कामगिरी मोजण्यासाठी आणि तुम्हाला अधिक संबंधित जाहिराती दर्शविण्यासह आमच्या जाहिरात सेवा सुधारण्यासाठी ही माहिती आम्ही वापरतो. Snapchat जाहिरातींबद्दल आणि तुम्ही पहात असलेल्या जाहिराती निवडण्यासाठी वापरल्या जाणार्या माहितीवर तुम्ही कसे नियंत्रण ठेवू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या जाहिरात प्रधान्ये पृष्ठाला भेट द्या.
तुमच्या निवडी
तुमच्या ब्राउजरमध्ये कदाचित तुम्हाला थोड्या किंवा सर्व ब्राउजर कुकी नाकारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच तुम्हाला तुमच्या ब्राउजरमधील कुकी काढून टाकणेही शक्य असेल. ब्राउजर कुकींचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुमच्या ब्राउजरमध्ये देण्यात आलेल्या सूचना पहा.
ब्राउजर कुकी
तुमच्या ब्राउजरमध्ये कदाचित तुम्हाला थोड्या किंवा सर्व ब्राउजर कुकी नाकारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच तुम्हाला तुमच्या ब्राउजरमधील कुकी काढून टाकणेही शक्य असेल. ब्राउजर कुकींचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुमच्या ब्राउजरमध्ये देण्यात आलेल्या सूचना पहा.
मोबाईल उपकरण ओळखचिन्हे
तुमच्या मोबाईलची कार्यप्रणाली कदाचित तुम्हाला अभिरुची-आधारित जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट उपकरण ओळखचिन्हांस नाकारण्याची अनुमती देईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल उपकरण-निर्मात्याने पुरवलेल्या सूचना पहाव्यात; ही माहिती साधारणपणे तुमच्या मोबाईल उपकरणाच्या 'सेटिंग्ज'शी संबंधित विभागात असते.
आणि अर्थातच, तुमच्या मोबाईल उपकरणात जर 'अनइंस्टॉल' करण्याचा पर्याय असेल, तर तुम्ही कधीही Snapchat ॲप अनइंस्टॉल करून या अॅपद्वारे तुमची माहिती जमा करण्यापासून आम्हास रोखू शकता.
तुमचे सेटिंग्ज बदला
तसेच आमच्या साईट्सवरील तुमचे सेटिंग्ज बदलून तुम्ही विशिष्ट कुकी ब्लॉक करू शकता.